शासकीय प्रशासक या शब्दाला साजेसे...
मारापुर प्रतिनिधी
जिथे आत्मविश्वास दृड असतो, तिथे नियती सुध्दा हार मानते..
या उक्तीस साजेल असे राजकारणात पदार्पण करुन गावातील सगळे पुढारी विरोधात असतानाही सर्वाना घाम फोडून लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेले व आम्हास वेळोवेळी मार्गदर्शन करणारे लोकनियुक्त सरपंच विनायकराव यादव यांच्या वाढदिवसानिमित्त आवताडे शुगरच्या वतीने आज सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार सोहळ्या वेळी ज्येष्ठ मार्गदर्शक विष्णूपंतजी आवताडे, मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे, दामाजी शुगरचे माजी संचालक भारत निकम, विजय माने पप्पू काकेकर, शेती अधिकारी रमेश पवार, ज्ञानेश्वर बळवंतराव व सर्व शेतकरी उपस्थित होते.