पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथील अभिनव अकॅडमीच्या वक्तृत्व, सूत्रसंचालन व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेच्या बाराव्या बॅचच्या समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. पी.सी.झपके सर बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, वक्त्याकडे सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास असला पाहिजे. वाचन, मनन, चिंतन आणि निरीक्षण करण्याची सवय प्रयत्नपूर्वक व्यक्तींनी जोपासली, वाढवली तर वक्तृत्व ही असाध्य वाटणारी वक्तृत्वकला सुद्धा प्रयत्नाने साध्य होते. यासाठी त्यांनी आपल्या भाषणातून अनेक स्वानुभव सांगितले.
प्रमुख पाहुणे श्री. रा. पा. कटेकर यांनी त्यांच्या मनोगतात म्हटले की, अभिनव अकॅडमीमुळे चांगले सूत्रसंचालक आणि वक्ते तयार होत आहेत ही भूषणावह बाब आहे.
प्रा. पी. सी झपके सर हे प्रमुख वक्ते म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रा. पां. कटेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनव अकॅडमीचे संचालक श्री .मंदार केसकर हे होते .
या कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत अभिनव अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी सौ .कविता राजमाने-धोत्रे, अध्यक्षीय सूचना श्री. राधेश्याम फाटके साहेब, अनुमोदन कु. आर्या माने हिने केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षणार्थी श्री.धनाजी राक्षे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रशिक्षणार्थी श्री. महेश सावंत, पृथ्वीराज पाटील यांनी करून दिला तर प्रशिक्षणार्थी यांच्या वतीने प्रातिनिधिक मनोगत डॉ. गौरव माने, श्रीमती भाग्यश्री खर्डे, चि. प्रथमेश बाबर यांनी व्यक्त केले तर अभिनव अकॅडमीच्या वतीने अभ्यागत व्याख्याते डॉ. सचिन लादे सर यांनी अभिनव अकॅडमीच्या प्रेरणेपासून आजपर्यंतची वाटचाल विशद केली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजन - नियोजन - संयोजन अभिनव अकॅडमीच्या सर्व प्रशिक्षणार्थी यांनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी श्री. अतुल वाघमोडे, सौ .गौरी देशपांडे, सौ. विजया बामणी यांनी केले तर आभार कु. अवनी उबाळे हिने व्यक्त केले.अभ्यागत व्याख्यात्या डॉ. मैत्रेयी केसकर, सोमनाथ गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास आदर्श शिक्षण मंडळीच्या सदस्या रेखा भालेराव, डॉ. प्रसाद कुलकर्णी, श्री. दिपक इरकल सर, प्रताप चव्हाण सर, प्रा. शशिकांत कराळे सर, ग्राहक पंचायतीचे श्री . शशिकांत हरिदास, अल्लापुरकर सर, संजय खंडेलवाल, वास्तुतज्ञ श्री. राधेश बादले पाटील, लायन्स क्लबचे डॉ. आकाश रेपाळ, प्रा.डॉ. अतुल आराध्ये श्री. गुज्जलवार, पत्रकार प्रशांत माळवदे, समाजसेवक श्री. सचिन शिंदे, नगरसेविका सौ. भाग्यश्री शिंदे, श्री. उन्मेश आटपाडीकर, प्रा. धनाजी चव्हाण, श्री.राम मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिनव अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी श्री. विजय हिवरे, सारंग महामुनी, डॉ. क्षितिजा कदम पाटील, श्री मधुकर पवार सर, सौ संगीता मधुकर पवार, डॉ.स्वाती शेडगे मॅडम, कु.अभिज्ञा उबाळे, कु.श्रावणी भांडेकर, श्री. ओंकार कापसे, श्री. रामेश्वर कोरे, कु. जान्हवी सरदार आदींनी परिश्रम घेतले. यावेळी हे प्रशिक्षण पूर्ण करणार्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. अध्यक्षीय समारोप श्री. मंदार केसकर यांनी केला.