भाळवणी प्रतिनिधी
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने परस्परांशी संपर्कासाठी नानाविध साधने बनवली व त्याचा वापर करून मानव प्रगती करत आहे. संपर्काची कधी नव्हती एवढी प्रचंड साधने आज जगात उपलब्ध आहेत त्याचा वापर करून गाव पातळीवर गावाची सुरक्षाव्यवस्था निर्माण करावी असे मत ग्राम सुरक्षा यंत्रणा चे जिल्हा समन्वयक विक्रमसिंह घाटगे यांनी यावेळी व्यक्त केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राजकुमार पाटील उपस्थित होते.
गावात होणाऱ्या चोऱ्या, दरोडा,आग लागणे,महिलांची छेडछाड,वाहन चोरी,गंभीर अपघात,वन्य प्राणी हल्ला अश्या अनेक घटनांमध्ये नागरिकांना त्वरित मदत मिळणे गरजेचे असते,आश्या सर्व घटनावर ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून मदत मिळू शकते अशी माहिती ग्राम सुरक्षा यंत्रणेचे वरीष्ठ विभागीय अधिकारी गणेश लोकरे यांनी दिली.
प्रत्येक गावात पोलीस स्टेशन कडून ग्राम सुरक्षा यंत्रांना सुरू करण्यात येत आहे, स्थानिक पोलीस ठाण्यात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते यांना एकत्रित घेऊन ही यंत्रणा उभी केली जाते अशी माहिती लोकरे यांनी दिली.
या करिता ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संपर्क नंबर 18002703600 हा आहे.गावातील आपत्कालीन वापरासाठी 24 तास 365 दिवस ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यावेळी उपसरपंच सविता लोखंडे ,ग्रामसेवक डी.एस.वाघमारे,ग्राम.सदस्य रणजित जाधव,अर्जुन लिंगे,नितीन शिंदे,विजय शिंदे,अमोल लिंगे,शशिकांत विभुते,आनंद देशपांडे,पोलिस नाईक कवले,पोलीस पाटील अर्जुन गवळी,संपर्क आधिकरी सतीश शिंदे,अनिकेत भोसले,आशा,अंगणवाडी सेविका,मदतनीस व ग्रामस्थ उपस्थित होते.