करकंब प्रतिनिधी
दहावीचा मराठी पेपर सुटल्या नंतर मोटार सायकल वरून जाताना राधा नागनाथ आवटे वय वर्ष 16 रा.बादलकोट या मुलीचा बार्डी रोडवर एम एस सी बी जवळ अपघातात वटलेले झाड पेटलेल्या अवस्थेत अंगावर पडल्यामुळे जागीच मृत्यू झाला .
ही मुलगी दहावीची परीक्षा देऊन आपल्या बहिणीकडे ढेकळेवाडी या ठिकाणी जात असताना हा अपघात झाला .ही मुलगी पेहे या केंद्रावर परीक्षा द्यायला आली होती. आज पहिला पेपर दिल्यानंतर हा अपघात झाला.या अपघाताची माहिती होताच परिसरात व विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत होती. तिच्याबरोबर असणारा तिचा भाऊ संदिप आवटे याला किरकोळ जखम झाली आहे.
अधिक तपास पोलीस नाईक अभिराज कांबळे हे करीत आहेत दुपारी पावणेतीन वाजता ही घटना घडली.घटनास्थळी व रुग्णालयात पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे यांनी भेट दिली .