पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या.डॉ.जयश्री भोसले यांना नुकतेच पंढरपूर येथील श्रेयस पॅलेस या ठिकाणी दिनांक ०१/०२/२०२३ रोजी कोहिनूर फाउंडेशन बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील अनुक्रमे सेवेबद्दल, विविध उपक्रमाबद्दल, शिक्षण क्षेत्रातील नाविन्य बदल,विविध स्पर्धा परीक्षेचे आयोजन तसेच संपर्पणाबद्दल हा पुरस्कार दिला असून यावेळी निशा कोपेकर बॉलीवुड एक्टर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
डॉ. जयश्री भोसले यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे अध्यक्ष एच.एम.बागल उपाध्यक्ष बी.डी.रोंगे खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी अभिनंदन केले.तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी देखील अभिनंदन केले.