उदय वाघवणकर वरळी प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई सरचिटणीस अर्जुन दत्ताजी मेघे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे व देवेंद्र आरोग्य मोफत चिकित्सालयाचे उद्घाटन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तजिंदर सिंह तिवाना , महाराष्ट्र सरचिटणीस व उप-महापौर विक्रांत पाटिल, सनी सानप -जिल्हा अध्यक्ष, शुभम लोखंडे -जिल्हा सचिव भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते तसेच विभागातील अनेक नागरिकांनी अर्जुन मेघे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.