सोलापूर प्रतिनिधी
लायन इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी व लायन्स क्लब सोलापूर रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिवस व लायन्स इंटरनॅशनल क्लबच्या माजी आंतरराष्ट्रीय संचालिका लायन डॉक्टर अरुणाजी ओसवाल क्लब अध्यक्ष सागर पुकाळे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून लायन्स अरुणोदय महिला सप्ताहचे आयोजन १ मार्च ते ८ मार्च असे वेगवेगळे सलग आठ दिवसा मध्ये १० सेवा कार्य चे आयोजन करण्यात आले आहे.
आज पहिल्या दिवशी लायन्स क्लब आणि कामिनी गांधी फॅशन इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने कामिनी गांधी इन्स्टिट्यूट जुनी फौजदार चावडी येथे महिलांसाठी फॅन्सी एम्ब्रॉयडरी चे मोफत कोर्स व 100 महिलांची मोफत नेत्र तपासणी चे आयोजन करण्यात आले होते या मोफत शिबिराचे उद्घाटन लायन्स क्लब ट्विन सिटी चे अध्यक्ष लायन अभियंता सागर पुकाळे व लायन्स क्लब सोलापूर रॉयलचे अध्यक्ष लायन डॉक्टर शिवाजी पाटील तसेच उपविभागीय सभापती शैलेश जी कोरवार सेवा सप्ताह प्रमुख नागेशजी बुगडे व कामिनी गांधी फॅशन इन्स्टिट्यूटच्या सौ. कामिनी गांधी सुदर्शन गांधी यांच्या हस्ते व प्रांतीय सभापती लायन नंदिनी जाधव MJF ममता बुगडे लायन उर्मिला खेरोडकर लायन सुजाता कोरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना लायन अभियंता सागर पुकाळे यांनी लायन्स अरुणोदय महिला सप्ताह मध्ये ८ दिवस ८ विविध ठिकाणी कोण कोणते महिलांसाठी सेवाकार्य आयोजित केले आहे व हे सेवाकार्य घेण्यामागचे कारण काय याचा सविस्तर माहिती देऊन या महिला सप्ताहचे महत्त्व पटवून सांगितले त्यानंतर लायन्स क्लब ऑफ रॉयल चे अध्यक्ष डॉक्टर शिवाजी पाटील यांनी महिला दिनाचे व तसेच महिला दिनानिमित्त घेत असलेल्या नेत्र तपासण्याचे कारण सांगत महिला दिनाची माहिती देऊन महिलांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर कामिनी गांधी फॅशन इन्स्टिट्यूटच्या सौ कामिनी गांधी यांनी त्यांच्या संस्थेची थोडक्यात माहिती सांगून फॅन्सी एम्ब्रोईडरी या मोफत कोर्सची माहिती दिली व स्वतः प्रत्यक्ष ३० विद्यार्थिनींना प्रात्यक्षिक दाखवून समजून माहिती दिली त्यानंतर त्या संस्थेच्या व इतर आजू बाजू परिसरातील १०० महिलांची मोफत नेत्र तपासनी करण्यात आली यावेळी लायन्स नेत्रालयाचे महासिद्ध म्हमाणे व सुवर्णा काळे यांनी नेत्र तपासणी केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंद्रायणी कोल्हापुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिपाली स्वामी यांनी केले या कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता लायन्स क्लबचे ला. राजेश परसगोंड ला. राजीव देसाई ला. गणेश खेरुडकर ला. नितीन साळुंखे कामिनी गांधी इन्स्टिट्यूट च्या मीनाक्षी मॅडम वैष्णवी झंपले योगिता पाटील आदींनी परिश्रम घेतले.