भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयात इयत्ता दहावीची परीक्षा सुरू झाली आहे.
या विद्यालयामध्ये एकूण 468 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसलेले आहेत. यामध्ये वसंतराव काळे हायस्कूल जैनवाडी 48, तांदुळवाडी माध्यमिक हायस्कूल 47 ,हनुमान विद्यालय 103, गार्डी हायस्कूल 34 ,तर भाळवणी विद्यालयाचे 236 विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहे. या विद्यार्थ्यांची बसण्याची सोय विद्यालयाच्या 19 खोल्यांमध्ये करण्यात आलेली आहे.
या परीक्षेचे केंद्रप्रमुख म्हणून प्राचार्य एन. एम. गायकवाड तसेच सहाय्यक केंद्रप्रमुख म्हणून एस. एस. दुधाट व एस. व्ही. जरे हे काम पाहत आहेत. यावेळी विद्यालयातील शिक्षक,सर्व कर्मचारी,पोलिस व विद्यार्थी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.