सोलापूर प्रतिनिधी
लायन इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी व लायन्स क्लब सोलापूर रॉयल आणि डॉक्टर गौरी बाचल यांच्या समर्थ होमिओपॅथिक क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व लायन्स क्लबच्या माजी आंतरराष्ट्रीय संचालिका लायन डॉक्टर अरुणाजी ओसवाल व अध्यक्ष लायन अभियंता सागर पुकाळे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आज लायन्स अरुणोदय महिला सप्ताह अंतर्गत समर्थ होमिओपॅथिक क्लिनिक वसंत विहार येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी घेण्यात आली यामध्ये स्त्रियांचे आजार त्वचेचे आजार गुडघेदुखी पित्ताचे विकार मुतखडा मुळव्याध इत्यादी आजारांवर महिलांचे मोफत उपचार करण्यात आले यावेळी अनेक महिलांनी लायन्स क्लब ने डॉक्टर गौरी बाचल यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या मोफत स्त्री रोग तपासणी शिबिरा बद्दल आनंद व्यक्त करत लायन्स क्लब ने महिलांसाठी घेत असलेल्या लायन्स अरुणोदय महिला सप्ताहाचे व त्यामध्ये सहभागी झालेल्या डॉक्टर गौरी बाचल यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
यावेळी लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी चे अध्यक्ष ला.अभियंता सागर पुकाळे तसेच लायन्स क्लब सोलापूर रॉयल चे अध्यक्ष ला. डॉक्टर शिवाजी पाटील उपविभागीय सभापती शैलेश कोरवार, नितीन साळुंखे, गणेश खेरोडकर, उर्मिला खेरोडकर, सुजाता कोरवार यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते