मारापुर प्रतिनिधी
मारापुरचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या 43 व्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळा व शिवजयंती निमित्त आयोजित व्याख्यानमाले मध्ये डॉ.श्रीमंत कोकाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची उजळणी केली.यावेळी त्यांनी शिवरायांच्या अनेक पैलूवर चर्चा करत तरुणाईला व्यसनापासून सावध राहण्याचा सल्ला दिला.जर प्रत्येक तरुणांनी शिवचरित्र आचरणात आणले तर ती तरुण पिढी एक आदर्श पिढी म्हणून उदय असेल येईल असे सांगितले तसेच त्याचबरोबर महाराजांच्या नेतृत्वगुणांची प्रशंशा करत गनिमी काव्याची माहिती दिली. यावेळी उपस्थित असलेल्या महिला वर्गाला संबोधित करताना जिजाऊंनी शिवबा घडवले नसते तर आजचे साम्राज्य उभारले नसते असे सांगत आपल्या मुलाला आदर्श कसे बनवता येईल याकडे त्यांनी त्यांचे लक्ष वेधले.
डॉ.कोकाटे यांनी गावांमध्ये मुलगी जन्मानंतर तिचे स्वागत करण्याची सूचना विद्यमान सरपंचांना करताच लगेच ग्रामपंचायत मारापुर यांच्या वतीने प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर समृद्धी सुकन्या योजना मध्ये एक हजार रुपयाचे ठेवणार असल्याची घोषणा केली.
या व्याख्यानाची सुरुवात सुप्रसिद्ध व्याख्याते विशाल इंदुलकर यांच्या क्रांतिसिंह नाना पाटील व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्याने झाली त्यांना प्रेक्षकांनी अक्षरश डोक्यावर घेतले.
अभिष्टचिंतन सोहळ्याच्या सत्काराला उत्तर देताना श्री.यादव यांनी सर्व ग्रामस्थ निमंत्रित मंडळींना संबोधित करताना सरपंच हा संपूर्ण गावाचा असतो,निवडणुकीनंतर सर्व गटातटांना एकत्र घेऊन विकास करणार असल्याचे सांगितले त्याचबरोबर गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी आज प्रमुख पाहुण्यांना दिली व पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून गावाचा काया पालट करू असे आश्वासन दिले.
सदर कार्यक्रमाला बबनराव आवताडे पतसंस्थेचे चेअरमन चंद्रकांत पडवळे,व्यवस्थापक संजय भुसे,डॉ.नितीन आसबे,गोपाळपूरचे युवा नेते महेश चव्हाण,राजाराम सुडके,संजय क्षीरसागर,प्रकाश पाटील,आप्पा मोरे,पप्पू जाधव,युवा उद्योजक राजकुमार यादव,डॉ. सत्यवान यादव,अभिमान जानकर दादासाहेब इंगोले,विजयकुमार यादव, बालाजी यादव,संतोष गांडुळे सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रम यादव यांनी तर आभार उपसरपंच अशोक आसबे यांनी मानले