सातारा प्रतिनिधी
सातारा होमगार्ड दलातील दोन कर्तव्यनिष्ठ महिलानी ड्युटीवर येत असता चार भिंतीच्या परिसरामध्ये तुफानी हाणामारी चालली होती त्यामध्ये या महिला त्या ठिकाणी जाऊन
जखमी अवस्थेत पडलेल्या एका मुलाला प्रथम उपचार देऊन दवाखान्यात दाखल केले आणि त्या मुलाचे प्राण वाचवले
या महिला नेहमी सातारा पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून नियमित बंदोबस्त करीत आहे अशा उत्कृष्ट काम करणाऱ्या मुलाचे प्राण वाचवणाऱ्या सातारा जिल्ह्यातील गृहरक्षक दलातील दोन महिला होमगडाचे पोलीस गृहरक्षक संघर्ष समिती, महाराष्ट्र पोलीस ,गृहरक्षक दल कडून मनःपूर्वक अभिनंदन केले जात आहे. तसेच पोलीस गृहरक्षक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संचालक सिध्दार्थ जाधव यांनी ही अभिनंदन केले आहे.
*"* *एकच ध्यास आधी खाकी नंतर* *बाकी"*