पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथे असलेल्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या कामकाजासाठी मंगळवेढा सांगोला व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक पक्षकार हे न्यायालयीन कामकाजासाठी ये जा करत असतात. परंतु त्यांना बस स्थानकापासून अगर सांगोला चौकातून जिल्हा न्यायालयात जाण्यासाठी रिक्षा खाजगी वाहण्याचा आश्रय घ्यावा लागतो. त्यामुळे त्यांना जास्त आर्थिक भुरदंड सन करावा लागतो.
याकरता जिल्हा सत्र न्यायालयासमोर राज्य परिवहन महामंडळ यांच्यावतीने एसटी थांबा सुरू करावी अशा असल्याचे निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे व संजय खंडेलवाल आदीने निवेदन लाड यांना दिले.
यावेळी आगार व्यवस्थापक सुतार यानी सकारात्मक भूमिका घेऊन लवकरच या ठिकाणी थांबा चालू करण्यात येईल असे सांगितले
या निवेदनात नमूद करण्यात आले की जुना कासेगाव रस्ता देवकते मळा व सांगोला रोड एम एस सी बी कॉलनी आदी परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात पंढरपूर शहरात ये जा करत असतात त्यांना वेळप्रसंगी रिक्षा व खाजगी वाहन मिळत नसल्याने तसेच पक्षकांरानाही न्यायालयात येण्या जाण्यासाठी वाहन उपलब्ध नसल्याने ताटकळत थांबावे लागते त्या ठिकाणी थांबा दिल्यास या परिसरातील राहणारे रहिवाशी विद्यार्थी नागरिक व पक्षकार यांची सोय होणार आहे.
याकरीता पंढरपूर आगारातून तसेच पंढरपूर मार्गे जाणाऱ्या सर्व बसेस यांना जिल्हा न्यायालयाच्या समोर थांबा देण्यात यावा व या सर्वांची गैरसोय दूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे.