सोलापूर प्रतिनिधी
इ. 12वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.अध्यक्ष निवड कु. श्रध्दा राऊत तर अनुमोदन कु. मिसबा इनामदार यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. प्राचार्य श्री. चिदानंद माळी सर यांनी भूषविले.प्रास्ताविक कु. तेहरीम बागवान हिने केले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
अध्यक्षांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार करण्यात आले.इ.12 वी. विद्यार्थी विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प देवून शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांनी आपली आठवण म्हणून कपाट व खुर्च्या भेट दिली.
यावेळी प्रमुख पाहुणे श्री बृहन्मठ होटगी शैक्षणिक संस्थेतील प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी सरांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ज्ञान व विज्ञान कसे उपयोगात आणावे याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.
शिक्षक मनोगतातून स्वामी सरांनी व पोटफोडे मॅडम यांनी परीक्षाचे महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी मनोगतातून विद्यार्थ्यांनी शिक्षकां प्रति आदर व्यक्त करताना अनेक आठवणींना उजाळा दिला.
अध्यक्ष मनोगतातून प्राचार्य माळी सरांनी विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाचे तंतोतंत पालन कसे करावे याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुलाणी सर यांनी केले.
सूत्रसंचालन कु. तेजस्विनी माने हिने केले. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक प्रमुख डॉ.मेडपल्ली मॅडम व व्हनकांबळे मॅडम यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काशीद सर, नदाफ ,मुलाणी मॅडम तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी लिबोंळे, बिराजदार व दिपाली नंदी या सर्वांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाची सांगता विद्यार्थीना अल्पोपहार देवून करण्यात आली.