सोलापूर प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहत रमाई आंबेडकर या त्यांच्या संघर्षमय आयुष्यातील सामर्थ्य व प्रेरणा बनल्या. पीडितांच्या व्यथांवर फुंकर घालत त्यांच्या उद्धारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत सदैव कार्यरत राहणाऱ्या त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेविक विनोद भोसले, माजी नगरसेविका वैष्णवीताई करगुळे, माजी नगरसेवक NK क्षीरसागर, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास बाबा करगुळे,संजय गायकवाड, लखन गायकवाड, नागनाथ कदम, तिरुपती परकीपंडला, पंडित सातपुते, विवेक कन्ना, राजेन्द्र शिरकुल, वसिष्ठ सोनकांबळे, बसवराज कोळी, मनोहर चकोलेकर, प्रमिला तुपलवंडे, द्रौपदी शिवशरण, अनिता भालेराव, दत्तात्रय नामकर, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्तित होते.