सोलापूर प्रतिनिधी
सोलापूरात विडी कामगार मोठ्या संख्येने असून विडी कामगार कुटुंबीयांचे उपजीविका याच उद्योगावर अवलंबून आहे. म्हणून बिडी कामगार मिळेल त्या ठिकाणी काम करून आपले कुटुंब चालवितात याच मजबुरीचा फायदा घेऊन बेकायदेशीर ठेकेदारी बिडी कारखानदार सर्व फायदा धाब्यावर बसवून कामगार व सरकारला फसवणूक करत आहे. म्हणून सोलापुरातील बेकायदेशीर ठेकेदारी बिडी कारखान्यावर कारवाई करावी. अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांना कामगार सेनेच्या प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे.
सोलापूर शहर हे कामगारांचे शहर असून प्रामुख्याने बिडी कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. बिडी उद्योग गेल्या काही वर्षापासून धूम्रपान कायदा व सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे संकटात येऊन त्याचा परिणाम विक्रीवर झाले विक्री कमी झाला कारखाने व्हिडिओ उत्पादन कामगारांची संख्या कमी करत आहे. परंतु सध्या महिलांना दुसरे काम येत नसल्याकारणाने मिळेल त्या मजुरीत कामगार काम करीत आहेत.
परंतु पुरेसे काम मिळत नसल्याकारणाने महिला ठेकेदारी कारखान्याकडे वळले कामगारांचा या मजुराचा फायदा घेऊन सोलापुरातील कामगार मोहल्यात बेकायदेशीर ठेकेदारी कारखानदार कामगारांना व शासनाला फसवणूक करून कारखाने चालून कामगार व सरकारला फसवत आहे अशा कारखान्याची तपासणी करून दोषी असलेले सर्व कारखानावर कायदेशीर कारवाई करा सर्व कारखाने बंद करावे असे कामगार सेनेचे निवेदनामध्ये म्हटले आहे.
विष्णू कारमपुरी (महाराज) यांचे नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णु कारामपुरी (महाराज), रेखा आडके, शोभा पोला, यल्लामा पेंटा, गुरुनाथ कोळी, पप्पू शेख, नागार्जुन कुसुरकर, आदी कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते