मारापुर प्रतिनिधी
गोवा राज्याचे मुख्यमंत्री ना. प्रमोदजी सावंत हे खाजगी कार्यक्रमानिमित्त सोलापूर दौऱ्यावर आले होते. सदर दौऱ्या दरम्यान त्यांनी पंढरपूर येथील श्री. विठ्ठल - रखुमाई भगवंत दर्शन केले.
हा दर्शन सोहळा आटोपून ते सोलापूरच्या दिशेने मार्गस्थ होत असताना मंगळवेढा तालुका भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा यांच्यावतीने लोकनियुक्त सरपंच विनायकराव यादव यांच्या हस्ते व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा मंगळवेढा बायपास येथे स्वागतपर सन्मान करण्यात.
यावेळी भाजपा युवा जिल्हा संघटन सरचिटणीस मा. सुदर्शन यादव, भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मा.नागेश डोंगरे भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मा. आदित्य मुदगुल - हिंदुस्थानी, मा. सुधीर करंदीकर, मा. आनंद मुढे, युवा मोर्चा शहराध्यक्ष मा.सुशांत हजारे, तालुका सरचिटणीस मा.अजित लेंडवे आदी मान्यवर उपस्थित होते.