भाळवणी प्रतिनिधी
भाळवणी ता पंढरपूर येथील वसंतराव काळे विद्यामंदिर प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम मोठया उत्साहात संप्पन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स शि वसंतराव काळे स. सा. चे कार्यकारी संचालक झुंझार आसबे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाळवणी गावाचे प्रथम नागरिक युवा सरपंच राजकुमार पाटील, तसेच संचालक चंद्रभागा शिक्षण सुनील पाटील, मा. सरपंच सुनील भानवसे, उदयोजक शकील भाई काझी,मा उपसरपंच दाऊदभाई शेख, सदस्य रणजित जाधव, पत्रकार प्रशांत माळवदे, युवा नेते निहाल शेख, राजू बाबर, सचिव हणमंत जमदाडे, वसंतराव काळे प्रशाला प्राचार्य दादासो खरात, भैरवनाथ विद्यालय आढीव प्राचार्य शिवाजीराव शेंडगे, चीफ इंजिनिअर औताडे ,तात्या इंगोले आदी मान्यवर उपस्थित होत.
प्रास्तविक करताना सचिव जमदाडे सांगितले की या प्रशालेमध्ये वर्षभर राबविण्यात आलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व शाळेची प्रगती पाहता उपस्थित सर्व पालकांनी मुलांचे प्रवेशाबाबत आणखीण सहकार्य करावे.
यावेळी उदयोजक शकीलभाई काझी यांनी शाळेच्या कामकाजबाबत कौतुक केले व तसेच पुढील स्पर्धेच्या युगात पाऊल टाकताना विदयार्थ्यांची प्रगती, परीक्षा, विविध उपक्रम याविषयी सूचना पर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आसबे म्हणाले, की समोर उपस्थित पालक वर्ग पाहता शाळेची प्रगती चांगली हो आहे. पारितोषिक प्राप्त विध्यार्थ्यांचं कौतुक केले करून अभिनंदन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी देवा श्री गणेशा, केळेवाली, ओम साई राम, चुडिया जो, मुळीच नव्हत रे कान्हा, चंद्रा, खंडोबाची कारभारीण, बुरूम बुरुम, झुमकावली पोर, डोळ्यात काजल, बैलगाडा शर्यत, तूझ्या माझ्या प्रेमाची जोडी क्वाकटेल, हृदयी वसंत फुलताना, सख्खी बायको मेली इ असे सुंदर नृत्य सादर केले.
यावेळी या कार्यक्रमाची अध्यक्ष निवड सुहास चौगुले यांनी केली. अनुमोदन आबासो जाधव यांनी दिले तसेच कायक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी काळे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक संजय काळे यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी नागनाथ जाधव ,सचिन काळे,इरफान शेख, अतुल गायकवाड, विद्या जमदाडे ,पुष्पा लिंगे, पुष्पा वाघमारे ,अश्विनी शिंदे,विलास लिंगे यांनी कष्ट घेतले .या वेळी परिसरातील विद्यार्थी,शिक्षक, पालक ,ग्रामस्थ, माताभगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.