दिल्ली प्रतिनिधी
मुंबईतील जोगेश्वरी येथील तरुण, तडफदार पत्रकार उदय सुभाष वाघवणकर यांची भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली या संस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
उदय वाघवणकर हे मागील १५ वर्षांपासून विविध मराठी हिंदी व इंग्रजी वर्तमानपत्रे, साप्ताहिक, पाक्षिक, दिवाळी अंक यामधून सातत्याने लिखाण करत असून ते अनेक सामाजिक संस्थांशी जोडलेले आहेत.गुन्हे पत्रकारितेत सुध्दा त्यांची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे.इंडिया २४ तास या आघाडीच्या वृत्तवाहिनीसोबत सुध्दा ते सध्या काम करत आहेत.उदय वाघवणकर यांना आतापर्यंत त्यांच्या या कामगिरीबद्दल अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
विमा पॉलिसी संपर्क - 8329354008
भारतीय दलित अकादमीचे पश्चिम उपनगर मुंबईचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार शरद बनसोडे यांनी त्यांची मुंबई पश्चिम उपनगर 'उपाध्यक्ष' पदी नियुक्ती केली असून समाजातील सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
तसेच तेज न्यूज चॅनल कडून हि अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.