पंढरपूर प्रतिनिधी प्रमोद बनसोडे
रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्यावतीने गुरुवार दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पंढरपूर आगारातील चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांची रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्याकडून "आरोग्य शिबिर" घेण्यात आले या शिबिरात १०० हून अधिक कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली असल्याची माहिती पंढरपूर रोटरी क्लबचे विद्यमान अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे यांनी माहिती दिली.
सद्या धावपळीच्या जीवनात एस. टी. कर्मचाऱ्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत दिसते. याच अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांनी पंढरपूर आगारातील जवळपास १०० हून अधिक कर्मचाऱ्यांची शुगर, रक्तदाब, ह्रदयस्वास्थय्य यासारख्या अनेक तपासण्या करून उपचार करण्यात आले.
यामध्ये बोलताना रोटरी अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे बोलताना म्हणाले, मागिल काही दिवसापासून वाहन चालक यांच्या मध्ये हार्ट अॅटॅक येण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. वाहन चालवत असतानाच चालकाला अचानक हार्ट अॅटॅक आल्याची माहिती आहे. चालक सुरक्षित तर प्रवाशी सुरक्षित असतो. यासाठी चालकासह परिवहन कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन वेळी उपचार घेणे आवश्यक असल्याचे मत डाॅ. कैलाश करांडे यांनी यादरम्यान व्यक्त केले.
या शिबिरात डाॅ. दिपक आचलारे, डाॅ. उषा अवधूतराव, डाॅ. श्रृती कुलकर्णी, डाॅ. बापू पाखरे आदींनी एस. टी. कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करूनच उपचार केले.
या शिबिरात रोटरी क्लब ऑफ पंढरपूरचे अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे, सचिव सचिन भिंगे, रो. सोमेश गानमोटे, रो. डाॅ. वर्षा पाटील ,रो. संगिता पाटील आदींसह रोटरी क्लबचे सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते. आगार कार्यालयाकडून रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांचे गुलाब देऊन स्वागत करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आगार व्यवस्थापक सुतार, वरिष्ठ लिपिक सुमित भिंगे सह रोटरी क्लब पंढरपूर यांनी परिश्रम घेतले.