पालकांनी आपले विचार मुलांवर न लादता त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना शिकूद्या:-संदीप वाघचौरे
महिलांच्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
करकंब प्रतिनिधी
करकंब प्रतिवर्षाप्रमाणे श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट करकंब यांचे वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार वितरण सोहळा, महिलांच्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ,आणि मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
सुरुवातीला प्रमुख पाहुणे संदीप वाघचौरे अध्यक्ष मिलिंद उकरंडे सचिव विजय भागवत पुरस्कारार्थी ज्ञानेश्वर दुधाणे,राणी सिदवाडकर ट्रस्टी प्रभाकर टेके,धनंजय इदाते, संतोष बुगड,संतोष पिंपळे, संजीवकुमार म्हेत्रे,राजेंद्र टकले, संगीता उकरंडे,संध्या भागवत या सर्व मान्यवराच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन झाले,आणि कार्यक्रमाला सुंदर अशा ईशस्तवन आणि स्वच्छतागीताने सुरुवात करुन वातावरण भक्तिमय झाले,त्यानंतर श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट करकंब यांचे वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना त्यामध्ये करकंब कोष्टी समाज भूषण पुरस्कार की पर्यावरण, स्वच्छतप्रेमी, प्राथमिक शिक्षक, आध्यात्मिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र,आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या करकंब येथील श्री ज्ञानेश्वर नारायण दुधाणे,कै.गोरखतात्या दाते स्मृती अध्यात्मरत्न पुरस्कार राणीताई सिदवाडकर यांना तर कै.पंढरीनाथ आण्णा दुधाणे स्मृती शिक्षणरत्न पुरस्कार गीतांजली टकले यांना सर्व मान्यवरांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
विमा पॉलिसी संपर्क 8329354008
संगमनेर येथील प्राख्यात व्याख्याते संदीप वाघचौरे यांचे मार्गदर्शन संपन्न होत असताना सांगितले की आईवडीलांनी आपल्या पाल्यांवर संस्कार योग्यवेळी योग्य त्या वयात केले पाहिजेत,आणि आपल्या मुलांवर आपले विचार किंवा आपली अपूरी स्वप्न न लादता त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिकण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे तरच ते आपले आयुष्य आनंदमय आणि सुखकर जगतील, पालकांनी आपल्या मुलांना सर्व काही शिकवत असताना घरातील बारीकसारीक गोष्टींसुध्दा शिकवता आल्या पाहिजेत नुसत्या पुस्तकी ज्ञानाला किंमत नसते व्यवहारज्ञान ही आत्मसात केले पाहिजे तरच तो समाजात आत्मविश्वासान जगू शकतो,असं अनेक अनमोल विचार सांगितलं,यानंतर महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,होऊ द्या धिंगाणा,झटपट स्पर्धा,पोत्यातील उड्या संगीत खुर्ची,या सर्व स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या आ पारितोषिके देण्यात आली.
यावेळी करकंब मधील महिलांनी व समाजबांधवांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवली होती तसेच मकरसंक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ वाटप हळदीकुंकू,आणि संध्या भागवत आणि देवकी दुधाणे यांच्या वतीने वाण म्हणून भेटवस्तू दिली.
अशा या सुंदर कार्यक्रमाच प्रास्ताविक सचिव विजय भागवत यांनी केले, सुत्रसंचलन मृणाली टकले,आणि शितल फासे यांनी केले,आभार साधना टकले यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट विशाल बोधे,मोहन बोधे, आणि कोष्टी समाज बांधव आणि महिलांनी अधिक परिश्रम घेतले.