मंगळवेढा प्रतिनिधी
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे नेहमी युवकांना वेगवेगळ्या संधी देत असतात. त्याचा त्या युवकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व समाजातील सर्व घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहावे असे मत श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना चे माझी व्हाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी यांनी सांगितले. ते आज गोपाळपूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.
गोपाळपूर ग्रामस्थांच्या वतीने मारापुर ग्रामपंचायतचे नूतन सरपंच विनायक यादव व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला .सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाळपूरचे युवा नेते महेश चव्हाण होते. या कार्यक्रमावेळी बोलताना श्री यादव म्हणाले की विद्यमान आमदार समाधान दादा यांच्या माध्यमातून गोपाळपूर तीर्थक्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून देऊन व गोपाळपूर ग्रामस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी व प्रदीप खांडेकर कायम तुमच्या पाठीशी आहोत. सदर वेळी गोपाळपूर ग्रामपंचायत सदस्य व इतर ग्रामस्थ उपस्थित होते