पंढरपूर प्रतिनिधी
कु. प्रज्ञा राजेश धोकटे हिने 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या रेल्वे ग्राउंड पंढरपूर या ठिकाणी संचलनामध्ये कवठेकर प्रशालेच्या मुलींच्या पथकाचे नेतृत्व केले होते.
त्याबद्दल तिचा सन्मान उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव , डी .वाय. एस. पी विक्रम कदम , तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर ,नगर पालिकेचे चीफ ऑफिसर अरविंद माळी , पंचायत समितीचे गट विकास आधिकारी प्रशांत काळे, सर्व अधिकारी वर्गाच्या उपस्थित करण्यात आला.