पालघर प्रतिनिधी उदय वाघवणकर
अंधेरी (पुर्व) येथील बिंद्रा कॉम्प्लेक्स मध्ये राहणारी कु. अनन्या कुणाल जाधव (वय वर्ष ५) हिने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कनोसा हायस्कूल मध्ये चमचागोटी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला .
तसेच बाळगोपाळ असोसिएशन संस्थेच्या विविध खेळांमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावून यश संपादन केले.राष्ट्रीय क्रिकेट असोसिएशनचे अंध क्रिकेटपटू नामदेव झाडे यांनी तिला पारितोषिक देऊन विशेष सत्कार केला.