वर्धा प्रतिनिधी उदय वाघवणकर
प्रजासत्ताक दिनानिमित्त गुरुवार दिनांक - २६ जानेवारी रोजी जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोड वरील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात कर्मचाऱ्यांकरिता क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले होते.
रुग्णालयातील एकूण चार संघांनी या क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला होता.दिपक राणे यांच्या नेतृत्वाखाली मेंटेनेंस विभागातील कर्मचाऱ्यांनी यावेळी अंतिम फेरीत विजेतेपदाला गवसणी घातली.