अतिशय गंभीर अस्थिरोगाने ग्रस्त 02 गरीब रुग्णांची सरकारी मदतीविना हेळसांड
सोलापूर प्रतिनिधी
गेल्या पंधरा दिवसापासून बापू गावडे (५२ वर्ष) व मोहम्मद साजिद आलम (२५ वर्ष) या दोन रुग्णांच्या गंभीर अस्थिरोगांवर सोलापूरच्या आडके हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग तज्ञ डॉ. संदीप आडके यांनी रशियन एलिझारोव्ह पद्धतीने यशस्वी इलाज केले आहेत.
बापू गावडे हा रुग्ण बारामती वरून एका अस्थिरोग तज्ञांनी आडके हॉस्पिटल कडे पाठवलेला आहे या रुग्णाचा चार महिन्यापूर्वी पाय फ्रॅक्चर होऊन त्यात बारामतीत रॉड घालण्यात आला होता परंतु हे शस्त्रक्रिया यशस्वी होऊन त्यामधून शस्त्रक्रिया केल्यापासून पू येत होता. हा रुग्ण अत्यंत गरीब असून त्यास पुढील रशियन शस्त्रक्रियेसाठी तीन लाखांपर्यंत खर्च येत होता. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मध्ये अर्थ सहाय्य मिळण्यासाठी अर्ज भरला होता व दररोज सहाय्यता निधीचे समन्वयक मंगेश चीवटे यांच्या संपर्कात असे परंतु मंगेश चीवटे यांनी त्याचा फोन घेण्यास बंद केले व त्याला एक रुपयाची मदत आलेली नाही. पंधरा दिवसापूर्वी खुद्द मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री सोलापूरच्या विमानतळावर आले असताना रुग्णाचे नातेवाईक त्यांना याबाबतीत भेटायला गेले असता ते यांना भेटले नाहीत व एका साखर कारखान्याच्या गाळात समारंभासाठी निघून गेले. मंगेश चिवटे सुद्धा सोलापुरात पक्ष बांधणीच्या कार्यक्रमात होते परंतु रुग्णांच्या सेवेसाठी कोणीही मदतीस आले नाही.
तसेच मोहम्मद आलम हा रुग्ण गरीब वायरमन असून काम करताना पडल्यामुळे त्याच्या डाव्या हाताचे हाडांचे फ्रॅक्चर झाल्याने त्यावर झारखंड येथे आतून पट्ट्या बसवण्यात आल्या होत्या, परंतु ही शस्त्रक्रिया अयशस्वी होऊन हाडे जुळली नाहीत व त्यातून पू येऊ लागला. त्यासाठी रशियन एलिझारोव्ह या अत्याधुनिक पद्धतीनेच ऑपरेशन करण्यासाठी तेथील डॉक्टरांनी डॉ.आडके यांच्याकडे त्याला पाठवून दिले. या रुग्णाचा खर्च दोन लाख पन्नास हजार पर्यंत होता. त्यांना आतापर्यंत कोणत्याही सरकारी अथवा नजीओ यांची मदत मिळालेली नाही. परंतु ही दोन्ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीच्या व लगेच करण्यासारख्या असल्यामुळे डॉ.संदीप आडके यांनी आपल्या हॉस्पिटल व आडके फाउंडेशन तर्फे ५० टक्के सवलत देऊन यशस्वी केलेल्या आहेत. परंतु दोघेही अत्यंत गरीब असल्यामुळे मदतीच्या अपेक्षेत आहेत.
ज्या समाजातील दानशूर व्यक्तींना, एनजीओ अथवा कंपन्यांना आपल्या सीएसआर फंडातून मदत करावयाची असेल त्यांनी आडके हॉस्पिटलच्या व्यवस्थापक डायना आडके, आडके हॉस्पिटल, सोलापूर. फोन ०२१७-२३१९५१४,९८२२१७६७७२. यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.