सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर शिवसेनेच्या वतीने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना सदस्य नोंदणी व पदाधिकारी संपर्क अभियाना अंतर्गत सोलापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील सर्व प्रभागामध्ये प्रभाग तेथे प्रभाव शिवसेनेचा दौरा अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. पुरूषोत्तम बरडे यांनी शहर उत्तर मतदार संघातील पदाधिकारी बैठकीत केली.
दि. ८ जानेवारी रोजी शिवसेना कार्यालयात (पद्मशाली चौक) शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे यांच्या अध्यक्षतेखाली व शहरप्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज), उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, संघटक अतुल भवर, शहर उत्तर मतदार संघाचे समन्वयक महेश धाराशिवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या बैठकीत प्रास्ताविक कारमपुरी (महाराज) यांनी करताना म्हणाले की, शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील सर्व प्रभागात शिवसेना सक्षम असली पाहिजे. यासाठी उपाय योजना व पक्षाचे विविध उपक्रम त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाचे महागाई बाबत पुर्ण दुर्लक्ष करणे. अशा गोष्टींचा प्रभागात जनजागृती करून पक्ष वाढिचे काम करावे. असे आव्हान केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात पुरूषोत्तम बरडे यांनी म्हणाले की, जनता जनार्दन राज्यातील मिंदे सरकार व केंद्रातील मोदी सरकार यांच्या जनविरोधी, कामगार विरोधी, महागाई व विरोधकांना चुकीच्या पध्दतीने लक्ष करणे. अशा गोष्टी जनतेस पुर्णपणे लक्षात आलेले आहे. त्याचबरोबर जनतेला होणारे त्रास दूर करण्याचे काम शिवसैनिक व पदाधिकारी यांनी पक्ष संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाव्दारे करून जनतेस या दोन्ही सकारचे खरे स्वरूप दाखवून द्यावे. शिवसेनोचा प्रभाव प्रत्येक प्रभागात वाढविण्याचे काम करावे. असे आवाहन केले. त्यसाठी १८ जानेवारी पासून प्रभागात शिवसेनेचा प्रभाव दौरा अभियान यशस्वी करावे. असे आवाहन कले. या अभियानात जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख हे प्रत्येक प्रभागात भेट देणार आहेत. या बैठकीत उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, समन्वयक महेश धाराशिवकर, शहर संघटक अतुल भंवर यांनी सदर अभियान यशस्वी करण्यसंबंधी आपले विचार मांडले.
शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील पदाधिाकऱ्यांच्या झालेल्या बैठकीत सुरेश जगताप, सोमनाथ शिंदे, शशिकांत बिराजदार, मलिक हब्बू, नागेश कोळी, महेश गवळी, विलास गुतर्गी, शिवा ढोकळे, विशाल नागनसुरे, अनिल दंडगुळे, यलल्ला मिठ्ठा, प्रशांत जक्का यांच्यासह शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.