भाळवणी प्रतिनिधी
वसंतराव काळे विद्यामंदिर चंद्रभागानगर,भाळवणी येथील प्रशालेत मातापालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला . त्या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालिका संगीताताई काळे ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसकरवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका जमदाडे मॅडम ,रायझिंग स्टार पब्लिक स्कूल च्या प्राचार्या खाडे मॅडम ,ग्रामपंचायत भाळवणी च्या उपसरपंच सविता लोखंडे मॅडम ,ग्रामपंचायत भाळवणीच्या मा.सरपंच पुनमताई गवळी तसेच सर्व माता पालक उपस्थित होत्या .
सुरुवातीला कै. वसंतदादा काळे व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन संगीताताई काळे व इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते झाले .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संगीताताई काळे यांनी भूषविले होते.
त्याप्रसंगी त्यांनी विद्यार्थी , पालक व शिक्षक यांची भूमिका काय असावी ,विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी पालकांनीही लक्ष देणे आवश्यक आहे अशा प्रकारे आपले मत व्यक्त केले .सौ जमदाडे मॅडम यांनीही पालकांनी विद्यार्थी घरी आल्यावर अभ्यास करतो की नाही हे पाहणं गरजेचे आहे असे सांगितले .
प्राचार्या गीतांजली खाडे म्हणाल्या , विद्यार्थ्यांना मोबाईल,टी व्ही,यांच्यापासून दूर करून त्यांना अभ्यास करण्यासाठी काय करावे याबद्दल मार्गदर्शन केले .प्रास्ताविक शिंदे मॅडम यांनी व सुत्रसंचालन पी पी काळे मॅडम यांनी केले .आभार व्ही यस जमदाडे यांनी मानले .
तसेच कार्यक्रमासाठी गावातील सर्व महिला मतापालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक बांधव व सर्वं भगिनींनी मोलाचे योगदान दिले.