उदय वाघवणकर पालघर प्रतिनिधी
भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली या केंद्रीय स्तरावरील मुंबई उपनगर विभागीय सहसचिव पदी संजय रघुनाथ सोनवणे यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष पंढरीनाथ पवार, महासचिव दत्ताराम घुगे, जोगेश्वरी एलआयसीचे सहाय्यक कर्मचारी व अनेक पुरस्कारांचे मानकरी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप मिळविणारे शरद बनसोडे, भारतीय दलित अकादमी पुरस्काराने सन्मानीत अलकाताई सानप तसेच महाराष्ट्र अपंग कर्मचारी संघटना नाशिक विभागीय कार्याध्यक्ष व ए.पी.जे अब्दुल कलाम इंटरनेशनल अकादमी फाऊंडेशनचे विभागीय प्रमुख बाळासाहेब सोनवणे यांनी हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.