सोलापूर प्रतिनिधी
लायन्स इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्विन सिटीच्या सन 2023 या दिनदर्शिकेचे उद्घाटन लायन्स क्लब प्रांत 32 34 ड- 1 चे लाडके प्रांतपाल MJF लायन राजशेखरजी कापसे व प्रांतातील प्रथम महिला लायन सौ. वैशाली कापसे यांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या प्रास्ताविक मनोगतामध्ये अध्यक्ष अभियंता लायन सागर पुकाळे यांनी यांनी वर्षभर करत असलेल्या अनेक ऍक्टिव्हिटी व विविध उपक्रम याबद्दल थोडक्यात माहिती देत आम्ही ह्या वर्षी सहा विविध कायमस्वरूपी प्रकल्प सुरू केल्याचे सांगितले तसेच ह्या वर्षामधील प्रांतातील पहिली दिनदर्शिका लायन्स क्लब आॕफ सोलापूर ट्विन सिटी च्या माध्यमातून झाली ही एक आजून आमची मोठी ॲक्टिविटी झाल्याचे सांगितले तर आपल्या उद्घाटन भाषणात प्रांतपाल राजशेखरजी कापसे यांनी लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी यांनी या वर्षातील राबवत असलेल्या विविध सेवाकार्य व अनेक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अध्यक्ष अभियंता ला.
सागर पुकाळे यांच्या विशेष योगदान व कार्याचे कौतुक केले व लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटीच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या यावेळी खजिनदार ला. राजेश परसगोंड जेष्ठ लायन मुकुंद जाधव ला. नंदिनी जाधव ला. राजिव देसाई ला. नागेश चपळग्गी इत्यादी उपस्थित होते.