पंढरपूर प्रतिनिधी
सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या "समृद्ध गाव अभियान" अंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग-कुडल व वडकबाळ गावातील ग्रामस्थांची "चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन" अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी चिंचणी गावावातील विविध विकास कामे, आदर्श शाळा मॉडेल, सोलापूर सोशल फाउंडेशनच्या संकल्पनेतून साकारलेली अभ्यासिका, गार्डन, लहान मुलांची खेळणी, ओपन जिम, विविध पर्यटन ठिकाणे यांची पाहणी कारण्यात आली.
सदर ठिकाणी उपस्थितांसाठी हुरडा पार्टीचे आयोजन कारण्यात आले होते. यावेळी सोलापूर सोशल फाउंडेशनचे संस्थापक मा. आ. सुभाष बापू देशमुख यांनी ही भेट देवून उपस्थितांशी संवाद साधला. चिंचणी गावाप्रमाणे आपणही आपल्या गावाची 'प्रमुख बलस्थाने' ओळखून गावाला समृद्ध बनवावे असे त्यांनी सांगितले.
चिंचणी गावाकडून याची प्रेरणा घेऊन आपल्या गावात विकास कामे करावीत. याकामी सोलापूर सोशल फाउंडेशन सदैव सहकार्य करेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी हत्तरसंग-कुडल संगमेश्वर देवस्थान समिती सदस्य व ग्रामस्थ तसेच फाउंडेशनचे मुख्य समन्वयक विजय पाटील, विजय कुचेकर उपस्थित होते.