भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील महात्मा फुले युवक संघटनेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाळवणी व वस्ती शाळा येथील विद्यार्थ्यांना वही, पेन व खाऊचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन येथील तलाठी कार्यालया जवळच्या मैदानात करण्यात आले होते. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ मार्गदर्शक ई. बा. मुलाणी गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दत्ता लिंगे, सुयश लिंगे, दिगंबर लिंगे, विक्रांत लिंगे, किरण लिंगे, अमोल लिंगे, गणेश शिंदे ,संदीप शिंदे, विजय शिंदे, अमोल शिंदे ,दीपक शिंदे, सचिन लिंगे ,कौस्तुभ लिंगे, श्रियश शिंदे ,प्रशांत लिंगे, सद्दाम सय्यद, भिमराव शिंदे, मुसा शेख, दत्तराज शिंदे, किशोर खरडकर, दिनेश गवळी, स्वप्नील जाधव, सौरभ लिंगे, दादा बुरांडे, विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.