सोलापूर प्रतिनिधी
निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन हुतात्मा स्मृती मंदिर येथे पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार होते. प्रमुख पाहुणे म्हणून नूतन हायस्कूल बोराळे प्रशालेचे सहशिक्षक संजीव कवचाळे,संस्थेचे खजिनदार ललिता कुंभार , सेवानिवृत्त मुख्याध्यापक रेवणसिद्ध रोडगीकर,माता-पालक संघाचे उपाध्यक्षा पुनम चव्हाण, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्रीनिवास जरबंडी, माजी विद्यार्थी अँड. संजय कुणी ,प्राचार्य विजयकुमार हुल्ले, राजराजेश्वरी शाळेचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आंळगे आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे व कै.बसवराज कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार यांनी वार्षिक अहवाल वाचन केले.
संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार म्हणाले, आपली मुलं हे आपली संपत्ती असून त्यांचा जतन करणे पालकांचा आद्य कर्तव्य आहे.त्यासाठी पालकांनी चांगले संस्कार करावे.प्रमुख पाहुणे संजीव कवचाळे म्हणाले, नेताजी शाळेने विविध उपक्रम राबवित असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती होत असल्याचे सांगितले.सूत्रसंचालन प्रशांत बत्तुल सर यांनी केले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, तेलगू व कन्नड भाषेतील कोळी गीत , छत्रपती शिवरायांवर आधारित गीत, देशभक्ती गीत, स्त्री शक्तीचा जागर करणारा नाटक, संदेश देणारी गीतांवर नृत्य सादर केले . पालक वर्ग भरभरून दाद दिली.