एका सामान्य शेतकरी कुटुंबातून निष्ठा आणि स्वकर्तुत्वाच्या जीवावर महाराष्ट्रातल्या वजनदार पक्षाचा उद्योग व व्यापार सेलचा प्रदेशाध्यक्ष म्हणून नागेशदादा फाटे यांची नियुक्ती होण्या एवढी सोपी गोष्ट नाही. पवार साहेब अजितदादा, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील सुप्रियाताई सुळे यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाच्या कसोटीत उतरून त्यांच्यासोबत काम करणं ही म्हणावी एवढी साधी व सोपी गोष्ट नाही.
उद्योग व व्यापारश्याचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर फक्त अध्यक्षपदाची सत्ता उबवायची आणि नेत्यांपुढे माग पुढं करायची ही गोष्ट नागेश दादांनी कधीच केली नाही.
या उलट चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून संपूर्ण तालुक्यांना तालुके गाव ना गाव पिंजून काढून उद्योग व्यापार सेलच्या शाखा उभा केल्या. पक्षाचा पाया मजबूत करण्याचे काम केलं.
एखादा पक्षाच्या असाही एखादा सेल असतो हे सामान्य माणसाला माहीत करून दिलं छोट्या मोठ्या उद्योगाची पक्षीय साखळी निर्माण केले आणि यासाठी सोबतींच्या सवंगड्यां सोबत महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन घेऊन महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायिक विषय असणारे अडचणी त्याचबरोबर विकासाच्या संधी याचा सर्वांगीण अहवाल पक्षप्रमुखांना देऊन पक्षाने दिलेल्या पदाला न्याय देण्याचे काम नागेश दादांनी नेहमीच केलं.
हे सर्व करत असताना एनपी उद्योग समूहाच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या शाखाा उभ्या आहेत त्याचेही काटेकोर नियोजन करण्याचं काम नागेशदादा यांनी सातत्याने केलं.
सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांच्या वरची निष्ठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच प्रेम सामान्य कार्यकर्त्याला देत असलेला आधार आणि स्वतःच्या उद्योगात घेतलेली भरारी ही नागेश दादांच्या हातून कधीही लपून राहिलेली नाही किंबहुना हि मुक्त कंटानं सरळ हातानं वेळोवेळी वाढतच राहिले.
सार्वजनिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना कौटुंबिक जबाबदारी ही तेवढ्याच निष्ठेने त्यांनी सांभाळलेले आहेत त्याचबरोबर सोबती नाही सुधारण्याची संधी देऊन त्यांच्याही कुटुंबामध्ये आर्थिक उन्नती करण्याचे काम नागेश दादांनी सातत्याने केलेला आहे.
नेता अडचणीत असतानाही आणि नेता सत्तेत असतानाही सतत साथ सोबत करणे ही नागेश दादांचा आणखीन एक गुणवैशिष्ट्य निष्ठेने सचोटीने काम करून आपल्या कामाच्या जीवावर जनमानसामध्ये स्थान निर्माण करणे हा त्यांचा स्थायी स्वभाव सर्वांशी हसत खेळत राहणं कितीही कटू प्रसंगांमध्ये संयमानं त्यातून मार्ग काढणे ही त्यांना मिळालेली दैवी देणगीच आहे.
आज उद्योग व व्यापारसएलचे प्रदेशाध्यक्ष नागेश दादा यांचा हाा वाढदिवस आहे पंढरीच्या पांडुरंगान् उदंड आयुष्य एस कीर्ती आणि वैभव हे समृद्ध हातानं द्यावं.
त्याचबरोबर उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था सोलापूरच्या विधान परिषदेमध्ये नागेश दादांना पक्षांना संधी द्यावी.
नक्कीच नागेश दादा त्या संधीचा सोनं केल्याशिवाय राहणार नाहीत सोलापूर जिल्ह्यातील उद्योग विकासाचा बॅकलॉग भरून काढल्याशिवाय राहणार नाहीत
एका ग्रामीण भागातील नव युवकाला जर उद्या ही संधी मिळाली तर सोलापूर जिल्ह्याचा चौफेर विकास झाल्याशिवाय राहणार नाही.ही सद्बुद्धी पक्षप्रमुखांना व्हावी पंढरीच्या पांडुरंगा ना या नवयुवकाला यासाठी आशीर्वाद द्यावेत.
एवढीच अपेक्षा आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त करूयात
दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
यशवंत व्हा कीर्तीवंत व्हा औक्षवंत व्हा.
साभार - रामचंद्र बागल
याच तेज न्यूज चॅनल कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !