सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये उमंग 2के22 उत्साहात संपन्न झाला.यादरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ट्रॅडिशनल डे, फनी गेम्स, संगीत, समाजप्रबोधन नाटक, मिस सिंहगड आणि मिस्टर सिंहगड आणि विविध कला गुणदर्शन मध्ये वैयक्तिक गायन, समूह नृत्य, समूह डान्स, लावणी, फॅशन शो असे विविध कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उमंग 2के 22 मधील स्पर्धेत क्रिकेट, बास्केट बॉल, हॉली बॉल, चेस, कॅरम कबड्डी, खो-खो आदी सह इतर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.मिस्टर सिंहगड व मिस सिंहगड या स्पर्धेत प्रथम वर्षाचे विद्यार्थी अनुक्रमे उदयनराजे भोसले व गौरी जिंदे विजयी ठरले.क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पटकावले.
विजेत्यांना सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व शेखर जगदे,सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सुनीता जॉन्सन,सिंहगड पब्लिक स्कूलचे उपप्राचार्य प्रकाश नवले, सिव्हिल विभागप्रमुख डॉ. प्रदीप तपकीरे,कॉम्प्युटर सायन्स विभागप्रमुख डॉ. दत्तात्रय गंधमल,जनरल सायन्स इंजिनीअरिंग विभागप्रमुख डॉ. विनोद खरात, इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा. विजय बिरादार,स्टुडन्ट वेलफेर डीन डॉ. सुवर्णा क्षीरसागर,स्पोर्ट्स विभागप्रमुख डॉ. करीम मुजावर ˈकल्चरल् विभागप्रमुख प्रा.लक्ष्मी जंगम आदी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनरल सेक्रेटरी चिन्मय झोड व स्टुडंट कौन्सिलचे सर्व कॉओर्डीनेटर तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा राऊत, सुझान नदाफ, सोनल केवले, सुजाता दूधभाते यांनी केले.