पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, दिनांक २७/१२/ २०२२ रोजी लोटस इंग्लिश स्कूलमध्ये आनंद बाजार डे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन कासेगावचे केंद्रप्रमुख आणि प्रमुख पाहुणे उमेश तरापूरकर,आणि बी. डी.पवार मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्कूलच्या प्राचार्या डॉ.जयश्री भोसले उपस्थित होत्या. या बाजार डे मध्ये इयत्ता ३री आणि इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या बाजारा मध्ये २०० पेक्षा जास्त स्टॉल लागले होते. यामध्ये भाजीपाला फळविक्रेतेचे १२५ स्टॉल होते.तर खाद्यपदार्थाचे २५ स्टॉल होते.
तर भेळ,पाणीपुरी,समोसा,वडापाव यासारखे २५ स्टॉल होते. खाद्यपदार्थ, शालेय साहित्य, गृह उपयोगी वस्तू,तसेच विद्यार्थ्यांनी सौंदर्यप्रसाधने,शोभेच्या वस्तू याचा सुद्धा स्टॉल लावला होता.याला महिला पालकांनी कॉलेजच्या विद्यार्थिनींनी भरभरून प्रतिसाद दिला. बाजार डे घेण्याचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना गणितीय ज्ञान समजणे, बाजार भाव समजावणे,चलनातील नानेवारी समजणे, त्यांच्या बुद्धीला आकडेवारीची चालना देणे.हा मुख्य उद्देश होता.अशी माहिती स्कूलच्या प्राचार्या डॉ.जयश्री भोसले यांनी दिली.या बाजारला पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
या बाजाराला उपस्थित राहिल्या सर्व पालकांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे,अध्यक्ष एच.एम.बागल,उपाध्यक्ष बी.डी.रोंगे, खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी अभिनंदन केले.तसेच या बाजार डे ला शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,कॉलेजचे विद्यार्थी,बहुसंख्य संख्येने उपस्थित होते.