सोलापूर प्रतिनिधी भैय्या खिलारे
महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार वारकरी संप्रदायाचे नेते आदरणीय युवकमित्र गुरुवर्य बंडातात्या कराडकर हे महुद बु|| येथे कीर्तनास आले असता सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. अनंतजी कुलकर्णी साहेब यांनी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तपपूर्ती सोहळ्यास सदिच्छा भेट दिली.
त्यावेळी पोलीस निरीक्षक अनंतजी कुलकर्णी यांचा व्यसनमुक्ती बाबत उल्लेखनीय कार्य पाहून अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायन मंडळ महुद बु|| व व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य शाखा महुद बु|| यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ कीर्तनकार गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार जगदीश कुलकर्णी, पत्रकार जगन्नाथ साठे, पत्रकार भैय्यासाहेब खिलारे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
सत्कारास उत्तर देताना अनंतजी कुलकर्णी साहेब यांनी हा सत्कार प्रेरणादायी आहे असे सांगितले. व्यसनमुक्ती ही काळाची गरज असून समाज त्यापासून परावृत्त राहिला पाहिजे. व्यसनमुक्ती आणि अध्यात्माची जर जोड असेल तर देशाची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी व्यसनमुक्त युवा छावा संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वैष्णव महाराज भोसले, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सहजिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली हेटकळे, व्यासपीठ चालक सुदाम महाराज मतकर, व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य सांगोला तालुका अध्यक्ष भीमराव येडगे सर, शाखाध्यक्ष मोहन जाधव, त्याचबरोबर ज्येष्ठ वारकरी युवा वर्ग व महिला मंडळ सर्वांच्या संख्येने उपस्थित होते.