राजसाहेब ठाकरे पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना शेतकरी मेळावा.. मोफत बियाणे वाटप.
वणी प्रतिनिधी
वणी जिल्हा यवतमाळ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ उंबरकर यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळावा आणि मोफत बियाणे वाटप या कार्यक्रमाचे उदघाटन आणि बियाणे वाटप मनसे नेते दिलीप बापू धोत्रे ,प्रवक्ते प्रकाश महाजन, राज्य उपाध्यक्ष आनंद भाऊ एमबडवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संभाजीनगर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दिलीप नाना बनकर, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.