पटवर्धन कुरोली प्रतिनिधी
पटवर्धन कुरोली ते शेवते रस्त्याचे काम सध्या सुरू आहे परंतु हे संबंधित काम थोरबोले ही कंपनी करीत असून हे काम अत्यंत निकरुष्ठ दर्जाचे सुरु असून संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
अन्यथा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याच्या कार्यालया समोर आदोलंन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. संबंधित रस्ता पूर्ण पणे निकरुष्ठ दर्जाचा असल्याने सामान्य नागरिकांन मधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे तरी संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करणार का असा प्रश्न पडला आहे ?
यावेळी ज्ञानेश्वर जवळेकर प्रदेश उपाध्यक्ष-बळीराजा शेतकरी संघटना,दादासाहेब चव्हाण आर आर आबा पाटील फाउंडेशन सोलापूर, मा.चेरअमन मेघेशाम काटकर, गणेश देशमुख सह शेतकरी उपस्थित होते.
गेल्या दोन-चार वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे कसतरी रस्ताच काम चालू झालं परंतु ठेकेदाराने मलमपट्टी करून रस्ता केला जात आहे.
गणेश देशमुख- शेतकरी