पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील हिंदू स्मशानभूमीच्या तीन नंबर कट्ट्याचे काम मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने आज पुन्हा सुरू करण्यात आले.प्रत्येक कट्टा दुरुस्त करून वापरात येण्यासाठी सहा दिवस लागत असून यापूर्वी दोन कट्टे तयार करण्यात आले आहेत.अशी माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी तेज न्यूजला दिली.
यावेळी मनसे नेते दिलीप बापु धोत्रे, नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर ,नगरसेवक प्रताप गंगेकर, मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील, मनसे उप शहराध्यक्ष गणेश पिंपळनेरकर, पैलवान विजय थोरात, नगर नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर, समाजसेवक माऊली गांडुळे ,शहाजी शिंदे इत्यादी उपस्थित होते.
स्मशानभूमी दुरुस्तीचा संपूर्ण खर्च मनसे नेते दिलीप बापू धोत्रे करीत आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.