मुंबई प्रतिनिधी - लक्ष्मण राजे
जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे व परिवार यांच्या वतीने आज नरक चतुर्दशी व लक्ष्मी पूजनाचे औचित्य साधून दिपावली निमित्त विभागात साफसफाई करणारे कर्मचारी (आरोग्य सेवक) यांना किराणा किट (तांदूळ, डाळ, साखर, रवा, कोलगेट, साबण, सनितायझर) देऊन सहकार्य करण्यात येईन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.खरतर हे आपल्या विभागातील आरोग्य दूत असून विभाग नेहमीच स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न करीत असतात.यांना अत्यंत तुटपुंजा पगार मिळत असून अनेक अडचणींचा सामना करत जीवन जगावं लागत.
अशा लोकांना सहकार्य करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच काम हिरवे परिवार मागील अनेक वर्षापासून करीत आहे.मिळालेलं मानव जन्म हा कोणाच्या तरी उपयोगी पडावा या भावनेतूनच ही मदत करण्यात आल्याचे हिरवे यांनी सांगितले व यापुढेही जमेल तसे आणि जमेल तेवढी मदत आम्ही करतच राहू अशी पुस्ती त्यांनी जोडली.याआधीही समाजातील अनेक वंचित घटकांना हिरवे यांनी सहकार्य केलेल आहे.