मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन गुरू डॉ. पवन अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच आरजू सभागृह दादर येथे टीडीएफ मुंबईच्या सक्रिय कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या गुणवंत मुलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात टीडीएफचे दिवंगत शिक्षक आमदार तात्यासाहेब सुळे व शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून झाली. TDF चे प्रमुख कार्यवाह शिवाजी कुलाल यांनी सर्वांचा परिचय करून दिला. डॉ. पवन अग्रवाल यांनी मुंबईच्या डब्बेवाल्यांच्या कौशल्याची आणि नेमकेपणाची अनेक उदाहरणे उपस्थितांना व मुलांना सांगून सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर प्राचार्य डॉ. सुखदा बाळासाहेब म्हात्रे, मुंबई टीडीएफचे माजी उपमहापौर बाबूभाई भवानजी, आदर्श शिक्षक सेवा संघाचे अध्यक्ष राजेश सिंह, अध्यक्ष जनार्दन जंगले यांनीही मनोगत व्यक्त केले.तर सुरेंद्र मिश्रा यांनी TDF च्या संघर्षाचा आढावा घेतला आणि मुंबईतील प्रत्येक शाळेत जाण्याच्या योजनेवर प्रकाश टाकला.सर्व विभागातील आदर्श शिक्षक आणि त्यांच्या गुणवंत मुलांचा मुंबईत सत्कार करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. Lत्यानंतर तात्यांचे शिष्य व मुंबईचे माजी उपमहापौर श्री बाबूभाई भवानजी यांनी तात्यासाहेबांचे विचार देशभर पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची घोषणा केली. तात्या व टीडीएफ यांचे विचार व कार्य प्रत्येक शाळेपर्यंत नेण्याचे आवाहन त्यांनी केले. समारंभात सर्व सक्रिय कार्यकर्त्यांचा व त्यांच्या गुणवंत मुलांना शाल, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
शेवटी आभार बी के पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रचालन प्रा. शीतल प्रसाद बडगुजर यांनी केले तर संयोजक गणेश हिरवे होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील वडतकर, लालजी कोरी,चंद्रकांत गायकर, बापूराव पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली
भवानजींनी यापूर्वी टीडीएफ टीमसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षणमंत्री केसरकर आणि शिक्षण विभागातील अनेक अधिकाऱ्यांची भेट घेतली होती आणि शिक्षकांच्या सर्व समस्यांबाबत त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली होती.शिक्षकांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी भवानजींनी अनेक गृहनिर्माण प्रकल्पही सुरू केले आहेत, ज्यामध्ये अत्यंत कमी किंमतीत शिक्षकांना घरे उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे.