भाळवणी प्रतिनिधी
सन 2022 - 23 यावर्षी न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी विद्यालयांमध्ये गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव संचलित गांधी विचार संस्कार परीक्षा 2022 ही एक ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडली. परीक्षेच्या माध्यमातून गांधीजींचे विचार विद्यार्थ्यांच्या अंगी रुजवण्याचा प्रयत्न फाउंडेशन मार्फत दरवर्षी केला जातो.
आपल्या विद्यालयामध्ये इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या 699 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता त्यापैकी 677 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. ही परीक्षा पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले .विभाग प्रमुख म्हणून उपशिक्षक श्री माने डी एम यांनी काम पाहिले .विद्यालयाचे प्राचार्य श्री गायकवाड साहेब यांनी सर्वांचे अभिनंदन केले.