प्लेसमेंट मध्ये कर्मयोगीचे पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध.
पंढरपूर प्रतिनिधी
अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षामध्ये शिकत असलेल्या म्हणजेच 2023 सा पास आऊट होणाऱ्या कर्मयोगीच्या बावीस विद्यार्थ्यांना तब्बल दहा लाखांचे पॅकेज मिळाले असून प्लेसमेंट क्षेत्रामद्धे कर्मयोगीने आपले प्रभुत्व कायम ठेवले आहे. सीआरटीडी टेक्नॉलॉजी प्रा. लि. या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी महाविद्यालयातील बावीस विद्यार्थ्याची निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.
सीआरटीडी टेक्नॉलजी प्रा. लि. ही सॉफ्टवेअर क्षेत्रातील बहुराष्ट्रीय नामांकित कंपनी आहे. या कंपनीने घेतलेल्या अंतिम निवड फेरीतून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील मयूरी कुलकर्णी, सिध्हेश्वर मुळे, ऐश्वर्या विभूते, प्रदीप मगदुम, पुजा लोखंडे, राहुल म्हेत्रे, निमा सरडे या विद्यार्थ्याची तर मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागातील शिवशंकर शिवणे, कल्याणी घाडगे, सद्गुरू पवार, अतुल व्यवहारे, सागर रीतुंड, अजित शिंदे, राहुल देवकर, विक्रम गोरे, सायराबानु शेख यांची तर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागातील स्वागता गायकवाड, चीत्रांजली उपासे, महेश व्यवहारे, गणेश मोरे, शिवराज वांडे, अस्लम शेख निवड करण्यात असून त्यांना प्रत्येकी वार्षिक दहा लाखांचे पॅकेज मिळाले आहे..
विशेष महत्वाची बाब म्हणजे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होण्याधीच च विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी मध्ये निवड होताना दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत दिले जाणारे प्रशिक्षण हे कार्पोरेट क्षेत्रात नोकरी लागण्यासाठी अतिशय पूरक व उपयोगी होत आहे असे निवड झालेल्या विद्यार्थ्यानी आवर्जून संगितले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागाचे प्रमुख प्रा. दीपक भोसले, मेकॅनिकल इंजनीअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पांचाळ, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. अनिल बाबर तसेच सर्व प्राध्यापक यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.