सोलापूर प्रतिनिधी
अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित भारत जोडो यात्रा (महाराष्ट्रात) मध्ये सहभागी होण्यासाठी कॉंग्रेस भवन सोलापूर येथे नावे नोंदवावीत असे आवाहन आ.प्रणिती शिंदे यांनी केले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दिलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा लवकरच येणार आहे या यात्रेत काँग्रेस नेते राहुलजी गांधी हे आपल्या राज्यातील नांदेड , हिंगोली ,वाशिम ,अकोला ,व बुलढाणा या जिल्ह्यात 16 दिवस सहभागी होणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या निर्देशानुसार सोलापूर शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कळविण्यात येते की सदर जिल्ह्यात होणाऱ्या
भारत जोडो यात्रेमध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे अशा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे आपली नावे आधारकार्ड व 2 फोटो सह नोंदवावी.
टिप:- नावे नोंदवितांना आधारकार्ड झेराक्स व 2 फोटो सह नोंदवावी.