मुंबई प्रतिनिधी - अनंत बोरसे
मुंबई येथुन प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक भगवे वादळ, या साप्ताहिकाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त समाजातील विविध श्रेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
यामध्ये दै. अक्षराज चे शहापूर येथील प्रतिनिधी अनंत बोरसे (प्रबोधनकार ठाकरे सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार), मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक गणेश हिरवे (क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक रत्न) पत्र लेखक - पत्रकार यशवंत चव्हाण (उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार), गुरूनाथ तिरपणकर(समाज भुषण पुरस्कार) यांना जाहीर झाला आहे.
त्याच बरोबर समाजातील विविध श्रेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या रविवारी ६ नोव्हेंबर रोजी मुंबईतील धारावी येथील गणेश विद्या मंदिर येथे वर्धापनदिन साजरा होत असुन यावेळी पुरस्कार्थीना विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास कामगार नेते अभिजीत राणे (संपादक दै. मुंबई मित्र), प्रफुल्ल फडके(संपादक दै. मुंबई चौफेर), स्नेहल आंबेकर(माजी महापौर, मुंबई), देवेंद्र भुजबळ, बाबुराव माने, महादेव देवळे, वसंत नकाशे, राजेश खंदारे, राजेश कदम, दादासाहेब शिंदे, शिवलिंग व्हटकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.