ठाणे प्रतिनिधी
शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्युपिटर हॉस्पिटल येथे लहान मुलांसाठी मोफत 2D इको तपासणी व हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराच्या उद्घाटन समयी उपस्थित राहून ० ते १८ वयोगटातील लहान मुलांची या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत मोफत 2D इको तपासणी करण्यात येत असून तपासणी नंतर हृदयाला छिद्र निदान झालेल्या बालकांची विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगत जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन याप्रसंगी केले.
याप्रसंगी आमदार शहाजी बापू पाटील, माजी नगरसेविका सौ.परीषा सरनाईक, जुपिटर हॉस्पिटलचे संचालक श्री.ठक्कर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.