मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
महाराष्ट्र विद्या विकास मंडळाचे सचिव व शां.कृ. पंतवालावलकर माध्यमिक विद्यालय कुर्ल्याचे माजी मुख्याध्यापक सत्येन्द्र सामंत यांचा सेवा गौरव समारंभ शनिवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी शाळेच्या सभागृहात संपन्न झाला.
यावेळी संस्थेचे दिवंगत सचिव द.ना. सामंत, स्वर्गीय स्मिताताई सामंत व स्वर्गीय प्रदीप सामंत यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दीपप्रज्वलन व ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व मोठा पुष्पहार देऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्येंद्र सरांना गौरविण्यात आले.याप्रसंगी शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना साखर वाटप करण्यात आली.संस्थेच्या खजिनदार स्नेहल सामंत यांनी अध्यक्षस्थान भूषवले.
संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सामंत, माजी नगरसेवक कमलाकर नाईक, नगरसेविका प्रवीणा मोरजकर, संतोष नाईक, मायकल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका गोम्स मॅडम, पुजारी साहेब, अशोक वेताळ सर, सामंत कुटुंबीय, शाळेचे मुख्याध्यापक महादेव यादव, उपमुख्याध्यापिका ज्योती नेमाडे, पर्यवेक्षक सतेज शिंदे, दशरथ सोळुंके आदी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक दडस यांनी केले असून उद्धव अमुप , लोखंडे , कटारनवरे, पांडे , गोळे , शमाने, नरेंद्र सामंत , माने , शाळेचे मुख्याध्यापक महादेव यादव सर यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सायली गायकवाड यांनी केले सर्व उपस्थितांचे आभार शाळेचे पर्यवेक्षक पटीलबुवा पाचारणे सर यांनी व्यक्त केले.