पळशी प्रतिनिधी
पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचा देण्यात येणारा यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जि.प.प्राथ.शाळा झांबरे मळा पळशी शाळेचे शिक्षक धनंजय नरळे याना प्राप्त झाला आहे.त्या निमित्ताने यांचा सत्कार पळशी गावचे पोलीस पाटील अशोक लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रमास पतंगराव कदम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.मोहन झांबरे सर व मा.अजीतदादा पवार कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सौदागर झांबरे,प्रा.संजय चव्हाण सर व भुईटेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री महादेव झांबरे सर,गार्डी जि.प.प्रा.शाळेचे .सिद्धेश्वर हाके , भारत फाटे सर, अंगणवाडी सेविका जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी भुईटेवस्ती जि.प.शाळेचे मुख्याध्यापक यांनी नरळे सरांचे खुप मनापासुन अभिनंदन करुन त्यांच्या हातून अजून अशीच समाज परिवर्तनवादी कार्य घडत राहो व शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर पडत राहो अशी आशा व्यक्त केली.
हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहन झांबरे यानी नरळे गुरुजींच्या कामातील सातत्य स्वत:ला त्या कार्यात झोकून देण्याची तयारी हिच त्यांची ओळख असून त्याचाच हा पुरस्कार पावती असल्याचे सांगितले.तर प्राचार्य सौदागर झांबरे यानी आपल्या मनोगतावेळी नरळे सर यांची इंग्रजीवर command असून ते निश्चितच त्यांच्या शिष्याना यशस्वी जीवनाच्या उत्तुंग शिखरावर पोहचवतील असा विश्वास व्यक्त केला.
पोलिस पाटील प्रा अशोक लोखंडे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की,नरळे सर म्हणजे कष्ट,जिद्द आणि जिज्ञासा यांचं एक रसायन आहे जे विद्यार्थ्यांच्या जीवनात उत्साह,प्रेरणा आणि स्फूर्ति देण्याचं काम करतं.ते स्वत: एक कोमल स्वभावाचे कणखर व्यक्तिमत्व असून मी त्याना नारळाची उपमा देतो कारण नारळ हा बाहेरुन टणक, ओबडधोबड पण अंतर्मनाने मृदू, भाऊक अगदी गोड नारळातील खोबरे व पाण्यासारखं आहे.
गार्डी जि.प.शाळेचे सिद्धेश्वर हाके यावेळी म्हणाले आज खर्या अर्थाने नरळे यांचा सन्मान म्हणजे कष्टाला आलेलं फूल आणि फळ आहे.जे सर्व जीवन आपल्या कर्तव्याला वाहुन इतरांच्या जीवनात सुगंध दरवळत ठेवणारे व्यक्ती आहेत.त्याना उत्तम दिर्घारोग्य लाभो त्यांच्या भावी वाटचालीस सर्वानी खूप खूप शुभेच्छा दिल्या,अभिनंदन केले व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.