सोलापूर प्रतिनिधी
लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी व जागृती माता नवरात्र महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने आज गांधी जयंतीचे औचित्य साधून परिसरातील नागरिकांसाठी मोफत दंत व डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शिबिर चे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन लायन्स क्लब ट्विन सिटीचे अध्यक्ष अभियंता ला. सागर पुकाळे यांच्या हस्ते जागृती माता देवीची पूजा करून करण्यात आले.
यावेळी सचिव अभियंता ला.रविकिरण वायचळ खजिनदार ला.राजेश परसगोंड ला.नागेश बुगडे ला. ममता बुगडे ला. नंदिनी जाधव ला. सोमशेखर बुगडे ला. ज्ञानेश्वर कुलकर्णी लायन्स नेत्रालयचे सुवर्णा काळे पंडित दीनदयाल उपाध्याय दंत महाविद्यालयाच्या माणिकशेट्टी मॅडम व त्यांच्या इतर डॉक्टर टीम सह मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ अमने ट्रस्टी सिद्राम गुब्याडकर, शरणू हिरेमठ, महादेव हरके, उंडाळे बंधू , श्रीकांत नसली, सुभाष येळमेली यांच्यासह परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.