अकलूज प्रतिनिधी
नेवरे ता . माळशिरस येथे १२५ सायकलींच्या सायकल बँकेचे उद्घाटन आमदार रणजितसिंह मोहिते -पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .
याप्रसंगी अंगणवाडी इमारत व 04 नूतन शाळा खोल्यांचे उद्घाटन आमदार रणजितसिंह यांच्या हस्ते झाले .
यावेळी डॉटर्स मॉम फाउंडेशनच्या अध्यक्ष शितलदेवी मोहिते -पाटील , नेवरेच्या सरपंच सविता सुरेश पाटील , अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते -पाटील ,गट विकास अधिकारी विनायक गुळवे , तालुका शिक्षणाधिकारी धनंजय देशमुख माजी उपसभापती प्रतापराव पाटील ,विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ आदी उपस्थित होते .